Contact +91 20 27168000
ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र

युवती विभाग

विभागाची उद्दिष्टे

  • समाजविकासासाठी युवतींचे व्यक्तिमत्व विकसन
  • युवतींमधील सामाजिक जाणीव आणि नेतृत्व गुण वाढण्यासाठीचे उपक्रम

संघटनात्मक रचना

सहविचार समिती
शालेय गट
महाविद्यालयीन गट
अन्य खाते

शालेय गट

  • नेतृत्व विकसन शिबीरइयत्ता ८ वीमधून ९ वीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी नेतृत्त्व विकसन शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये मुलींमध्ये नेतृत्त्वगुणांचा विकास, गटबांधणी, सामाजिक जाणीव, व्यायाम आणि उपासना यांचा समावेश असतो. या शिबिराच्या माध्यमातून मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. विशेषतः त्यांच्यातील नेतृत्त्वगुण, सामाजिक जाणिवा आणि आत्मविश्वास यांचा अभ्यासपूर्वक आणि सर्जनशील विकास होतो. हे शिबिर मुलींना विचाराने आणि कृतीने सक्षम, जबाबदार आणि सजग नागरिक बनण्यासाठी प्रेरित करते.
  • साप्ताहिक दलसाप्ताहिक दलांमध्ये विविध खेळ व कृतीसत्रांसोबतच सामाजिक प्रश्नांवरील माहिती व चर्चाही घेतली जाते. त्याचबरोबर मुलींना पुढील करिअर व ध्येय निर्धारणासाठी मार्गदर्शन दिलं जातं. त्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक शाखा, संधी आणि पर्याय यांची माहिती देऊन योग्य दिशेने पुढे जाण्यास मदत केली जाते.

साप्ताहिक दलातील उपक्रम

  • शाडू मातीचा गणपती, घोराडेश्वर येथील वृक्षारोपण , बरचीचे रंगकाम, सायकल सहल, विद्याव्रताचे शिबिर

महाविद्यालयीन गट

  • साप्ताहिक दलमहाविद्यालयीन उपक्रमांतर्गत दर रविवारी साप्ताहिक दल घेतले जाते. यात अनेक युवती एकत्र येऊन विविध खेळ आणि गटसहभागातून आनंददायी वेळ घालवतात. दलााच्या शेवटी सध्याच्या राष्ट्रीय घडामोडींवर, वर्तमान घडामोडींवर, किंवा विभागातील इतर उपक्रमांमधील विशेष कामगिरीवर चर्चा होते. तसेच, महत्त्वाच्या माहितीचा आदान-प्रदानही केले जाते. हे साप्ताहिक सत्र केवळ खेळापुरते मर्यादित न राहता, विचार, जागरूकता आणि एकत्रित सहभाग यासाठीचे एक सशक्त माध्यम ठरते.
  • दीपोत्सव महाविद्यालयीन उपक्रमांतर्गत दरवर्षी दिवाळीच्या काळात ‘दीपोत्सव’ साजरा केला जातो. या दिवशी सर्व युवती एकत्र येऊन त्या वर्षीच्या सामाजिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर आधारित एखाद्या आशयपूर्ण कृतीसत्रात सहभागी होतात. पंत्यांद्वारे काहीतरी अर्थवाही, संदेशपर सादरीकरण केलं जातं, ज्यातून विचारमंथन व चर्चा घडते. कार्यक्रमाचा समारोप मातृभूमीच्या आरतीने होतो, आणि साऱ्या वातावरणात एकात्मता व श्रद्धेची भावना भरून राहते. ‘दीपोत्सव’ हा दिव्यांबरोबरच विचारांचाही उजाळा असतो.
  • गिर्यारोहण युवती विभागाच्या मुख्य उद्दिष्ट संघटन, याला धरून चालणारा एक उपक्रम म्हणजे गिर्यारोहण. या उपक्रमात विविध वयोगटांतील युवतींचा सहभाग असतो. सह्याद्रीतील अनेक गड-किल्ले यामध्ये समाविष्ट असतात. प्रत्येक मोहिमेदरम्यान संबंधित गडाचा इतिहास, त्याचं महत्त्व आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी यावर माहिती दिली जाते. या उपक्रमातून केवळ निसर्गसंपन्न परिसरात भटकंती होत नाही, तर शारीरिक तंदुरुस्ती, गटबांधणी आणि राष्ट्राभिमानाचं बळही अधिक गडद होतं. एकत्र येणं, शिकणं आणि अनुभव घेणं – या सगळ्यांचा संगम या गिर्यारोहणातून घडतो.

साप्ताहिक दलातील उपक्रम

  • तंबू शिबिर, कोजागिरी पौर्णिमा साजरी केली, नागरी वस्ती दल, दिपोत्सव, साप्ताहिक दल, किल्ले बनवा स्पर्धा

अन्य महत्वाचे उपक्रम

गणेशोत्सव

  • बर्ची‘बर्ची’ हा शिस्तबद्ध नृत्याचा प्रकार असून, त्यात काही सर्जनशील हातरचना करून प्रात्यक्षिक व मिरवणुकीद्वारे प्रभावी सादरीकरण केलं जातं. गणेशोत्सव कसा अर्थपूर्ण, शिस्तबद्ध आणि जबाबदारीने साजरा करावा, याचं बर्चीच्या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श उदाहरण मांडण्याचा प्रयत्न असतो. या उपक्रमात युवतींसोबतच इयत्ता ८ वी ते १० वीच्या शालेय गटांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. तयारी, शिस्त आणि सामूहिक सौंदर्य यांचा मिलाफ बर्चीतून प्रकर्षाने दिसतो. बर्ची म्हणजे शिस्त, एकजूट आणि सामाजिक भान यांचा समन्वय – जो तरुण पिढीला योग्य दिशा देणारा ठरतो.
  • वाद्य पथकबर्चीला प्रभावीपणे सादर करण्यासाठी सहाय्यक म्हणून निनाद वाद्यांचा समावेश करण्यात येतो. यामध्ये युवतींचा स्वतंत्र वादन गट कार्यरत असतो, तसेच ध्वजवाहक युवतींचाही संचात समावेश असतो. ढोल, तशा, ध्वज आणि बर्ची यांचा सुसंगत समन्वय एक शिस्तबद्ध, सौंदर्यपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण घडवून आणतो.
  • निर्माल्य संकलन उत्सव काळात जमा होणारे निर्माल्य एका ठराविक संस्थेला देण्यात आले, जी त्याचा वापर करून धूप व अगरबत्ती बनवते.
  • धूप निर्मिती कार्यशाळा घराघरात निर्माल्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी मोठ्या सहभागाने कार्यशाळा आयोजित करण्यात येते.
  • पथनाट्य राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित पथनाट्य विविध ठिकाणी सादर करण्यात आले. ११ वीच्या युवतींनी याचे संकल्पनादेशन, सराव आणि सादरीकरण स्वतःहून केलं.
  • शंख वादन युवतींना शंख वादन शिकवून प्रत्येक मिरवणुकीच्या आधी सामूहिक शंखनाद करण्यात आला.
  • साहित्य विक्री उपक्रम लागणाऱ्या साहित्याचे एकसंध सेट तयार करून त्याची विक्री करण्यात आली. या उपक्रमात नियोजन, बांधणी आणि विक्री यामध्ये युवतींचा सक्रिय सहभाग होता.

भक्तिरंग

  • राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी, युवती विभागातर्फे एक उपक्रम राबवण्यात आला. राम मंदिराच्या आकृतीची रचना जमिनीवर आखली गेली आणि त्या संपूर्ण रूपरेषेवर दिवे लावण्यात आले. या दिव्यांच्या प्रकाशात मंदीराची आकृती उजळून निघाली आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी बनलं. हा उपक्रम केवळ एक प्रकाशोत्सव नव्हता, तर श्रद्धा, एकात्मता आणि सांस्कृतिक जाणीवेचं प्रतीक ठरला. हे आमच्या विभागातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि भावनिक पातळीवर भिडणारे सादरीकरण होतं.

गिर्यारोहण

  • एक विशेष उद्दिष्ट म्हणून आम्ही वर्षभरात महिन्याला एक अशा पद्धतीने एकूण १२ ट्रेक्स पूर्ण केले. हा एक प्रकारचा सलग उपक्रम – एक श्रृंखलाच – ठरला. या मोहिमांमध्ये सह्याद्रीतील विविध ऐतिहासिक गड-किल्ल्यांना भेटी देण्यात आल्या. प्रत्येक गडासोबत त्याचा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि स्थानिक परंपरांची माहिती दिली गेली. या उपक्रमातून युवतींमध्ये संघटन कौशल्य, नेतृत्व, जाणीव आणि शारीरिक तंदुरुस्ती या साऱ्यांचा समतोल साधला गेला. ट्रेकिंग ही केवळ निसर्गाची ओळख नव्हे, तर आत्मघडणीची एक सशक्त वाट ठरली.

अभ्यास दौरे

  • गुजरात दौरा १२वी झालेल्या युवतींसाठी आयोजित केलेला आठ दिवसांचा गुजरात दौरा हा अत्यंत संस्मरणीय आणि शिकवण देणारा ठरला. या दौऱ्यात मुलींनी गुजरातमधील महत्त्वाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थळं भेटून अनुभवली. त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींशी भेटीगाठी करून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अनुभवांतून शिकण्याची संधी मिळाली. जगप्रसिद्ध Statue of Unity पाहणं हा या दौऱ्यातील विशेष क्षण ठरला. एकूणच, हा दौरा मुलींना नव्या दृष्टीकोनासह सामाजिक जाणिवा, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास देणारा अनुभव ठरला.
YouTube