Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

गुरुकूल

विभाग परिचय

पंचकोष विकसनावर आघारीत, गुरुकूल विभागाची सुरवात १९९७ साली, शाळेचे त्याकाळचे केंद्र प्रमुख, आ. वामनराव तथा भाऊ अभ्यंकर, यांच्या पुढाकाराने झाली.
पंचकोष विकसनावर आघारीत शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास करून या विभागाची सुरुवात झाली.

विभाग उद्दिष्टे

मुलांनी पुढे नमूद केलेल्या विषयांवर प्राविण्य मिळवण्यासाठी या विभागात विशेष प्रयत्न केले जातात :
  • शरीर निरोगी व सशक्त बनवणे
  • दुसऱ्यांप्रती संवेदनशील भाव असणे
  • बुद्धीचा व विविध कौशल्यांचा विकास करून, समाज व देश विकसनासाठी त्याचा उपयोग करणे
  • मानसिक आरोग्य व इंद्रियांवर नियंत्रण याद्वारे स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे
  • संयमाने आपले जीवन आनंदी बनवणे
  • राष्ट्र विकसनामध्ये आपले योगदान समजून घेऊन त्यासाठी प्रयत्न करणे

विभागाची वैशिष्ट्ये

  • एका वर्गात केवळ ३० विद्यार्थी व प्रत्येक वर्गासाठी २ प्रमुख वर्ग शिक्षक
  • "सेमी इंग्रजी" शिक्षण पद्धतीचा अवलंब
  • विविध स्पर्धात्मक परीक्षा देण्याची संधी
  • ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी "संस्कृत" विषयाचे विशेष प्रशिक्षण
  • वसतिगृहाची व्यवस्था (मोजक्या विद्यार्थ्यांसाठी)