Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
खेळाडू घडविणारा प्रकल्प

क्रीडाकुल

विभागाची उद्दिष्टे

  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम खेळाडू घडविणे.
  • मूलभूत शारीरिक क्षमता व कार्यक्षमता यांच्या आधारे प्रशिक्षण देणे.
  • आयुर्वेदीय तत्वांचा वापर, खेळाडूच्या क्रीडाप्रकार निवडीसाठी व दीर्घकालीन अभ्यास करण्यासाठी करणे.
  • खेळाडूंसाठी आवश्यक अशी प्रयत्नवादी चिवट व आक्रमक वृत्ती घडवणे.
  • स्वयं अध्यापनाच्या पद्धती शिकवून कमीत कमी वेळात नेमका अभ्यास करण्यास शिकवणे.

विभागाची वैशिष्ट्ये

  • मर्यादित विद्यार्थी संख्या
  • १२ तासांची शाळा
  • वर्षातील ३६५ दिवसांपैकी २८० दिवस शाळा
  • क्रीडा,शिक्षण,मानस आणि आरोग्य तज्ज्ञांव्दारे नित्य मार्गदर्शन
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम आणि संस्कारक्षम वातावरण
  • आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित आहार पुरवण्यासाठी स्वतंत्र न्याहारी कक्ष
  • स्पर्धात्मक कामगिरी वाढवण्यासाठी मानसिक प्रशिक्षणाच्या सत्रांमधू खेळाडूची मानसिक व बौद्धिक कौशल्ये विकसित करणे.

सुविधा

  • २.५ एकराचे प्रशस्त मैदान
  • तंदुरुस्ती मिळवण्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा
  • सर्व साहित्यांनी सुसज्ज असा जिम्नॅस्टिक हॉल
  • खेळाडूंच्या दुखापती निवारण व प्रतिबंधात्मक उपचारांसाठी फिजिओथेरपीची सोय
  • अभ्यास व मनोरंजनासाठी सीडी, व्हीसीडी व पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय
  • मर्यादित खेळाडूंसाठी सहनिवास व्यवस्था

विभाग रचना - अध्यापक वृंद

मा. मनोज देवळेकर - क्रीडाकुल विभाग प्रमुख

शिक्षण : –

  •  B.Sc. M.P.Ed.
  •  I.O.C. (International Olympic Committee) द्वारा आयोजित Solidarity Course.
  •  पतियाळा येथील ॲथलेटिक्स N.I.S. प्रमाणपत्र वर्ग ‘अ’ श्रेणी.
  •  M.C.C. प्रशिक्षण वर्ग पूर्ण.   ( ॲथलेटिक्स राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण. )

शैक्षणिक कार्य : –

  • ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे १९८९ जून ते आजपर्यंत गेली तीस वर्ष शारीरिक शिक्षण व गणित या विषयाचे अध्यापन.
  • विद्यालयातील सर्व (१२००) विद्यार्थ्यांचे दैनंदिन शारीरिक विकसन व्हावे याकरिता विशेष योजना.
  • उन्हाळी व हिवाळी सुट्टीमध्ये व्यक्तिमत्व विकसन व क्रीडा प्रशिक्षणासाठी विविध प्रकारच्या शिबिरांचे यशस्वी आयोजन.
  • बरची नृत्याच्या माध्यमातून विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांना दरवर्षी शिकवून गणेशोत्सवामध्ये विविध मंडळांसमोर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.
  • ब्रिटिश कौन्सिल बरोबर राष्ट्रीय स्तरावर खेळातून ‘नेतृत्व विकसन’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
  • दिल्ली येथे ‘बुद्धिमंतांचे शिक्षण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘खेळातील यशासाठी आवश्यक बुद्धीचे गुण’ या विषयावर सादर केलेल्या निबंधाचे सहलेखन.

पुरस्कार : –

  • १९९९ मध्ये चिंचवड गाव येथील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ गांधी पेठ तालीम द्वारे देण्यात येणारा सामाजिक कार्याबद्दलचा ‘क्रांतिवीर हुतात्मा चाफेकर पुरस्कार.’
  • पिंपरी चिंचवड महानपा., रोटरी क्लब चिंचवड, लायन्स क्लब निगडी आणि टेल्को समाज विकास केंद्र इत्यादी संस्थेद्वारे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार
  • स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन निगडी द्वारे २००१ मध्ये शिक्षकांसाठीचा ‘स्वामी विवेकानंद कृतज्ञता पुरस्कार.’
  • मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा  ‘अध्यापकोत्तम पुरस्कार.’ 
  • महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कॅप्टन शिवरामपंत दामले यांच्या स्मृतिदिनानिमित्त २००३ साली ‘दामले पुरस्कार.’
  • मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी द्वारा २००५ साली मा. ‘वा.ना. अभ्यंकर पुरस्कार’ आणि  ‘परशुरामीय पुरस्कार.’
  • सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे येथील माजी विद्यार्थी संघटनेद्वारे २००५ साली ‘आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
  • विश्व विवेक फाउंडेशन पिंपरी द्वारा २००६ साली ‘आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
  • पूर्णवाद स्पोर्ट्स अॅण्ड हेल्थ प्रमोशन अकॅडमी तर्फे २०१६ साली  ‘कै. सुधीरदादा जोशी स्मृती क्रीडातपस्वी पुरस्कार

सौ.संपदा कुलकर्णी - क्रीडा प्रशिक्षण विभाग प्रमुख

शिक्षण  : –   बी.ए. बी.पी.एड.

अनुभव : –

  • ॲथलेटिक्स  प्रशिक्षक.
  • खेळाडू घडविणाऱ्या क्रीडाकुल या विभागात गेल्या २२ वर्षांपासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे.

पुरस्कार : –

  • क्रीडा शिक्षक गौरव पुरस्कार  (२०१४/१५ )
  • गुणवंत क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक पुरस्कार (२०१७/१८)

वैद्य सौ. दिप्ती धर्माधिकारी - क्रीडा आरोग्य विभाग प्रमुख

शिक्षण  : –  B.A.M.S., D.Y.A., Post graduation diploma in child psychology

अनुभव : –

  • क्रीडा आयुर्वेद या विषयावर ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथे दहा वर्षांपासून कार्यरत

शैक्षणिक कार्य : –

  • शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी दैनंदिन जीवनात आयुर्वेद या विषयावर सातत्यपूर्ण संवाद, लिखाण व विविध प्रकल्पांच्या माध्यमातून रूजविण्याचा प्रयत्न.

पुरस्कार : –

  • आयुर्वेदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह केलेले दोन प्रकल्पांना बाल वैज्ञानिक स्पर्धेत सलग दोन वर्षे राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक प्राप्त.

सौ. आरती खोत - क्रीडा मानस विभाग प्रमुख

शिक्षण : –  M.A .Psychology

अनुभव : –

  • क्रीडा मानस विभागात १५ वर्षापासून कार्यरत.

 शैक्षणिक कार्य : –

  • विविध मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधाराने खेळाडूंची psycho profile तयार करणे.
  • क्रीडा प्रकार नुसार मानसिक प्रशिक्षण देणे.
  • विविध मानसिक क्षमता विकसनासाठी वर्गवार तासिका घेणे.
  • अध्ययन अप्रगत मुलांना मार्गदर्शन करणे.
  • विद्यार्थी-खेळाडू, प्रशिक्षक व पालक यांना समुपदेशन करणे.
  • मुले व मुलींसाठी Sex education वर आधारित सत्र घेणे.
  • पालक कार्यशाळांचे आयोजन.
  • स्टेट लेव्हल शिक्षण परिषद तसेच चंद्रशेखर आगाशे कॉलेज फॉर फिजिकल एज्युकेशन येथे क्रीडा मानस शास्रावर आधारित प्रबंधाचे सादरीकरण.    

 पुरस्कार : – 

  • क्रीडाकुल तज्ज्ञ कार्यकर्ता पुरस्कार

सौ. पद्मजा थिटे - क्रीडाकुल शिक्षण विभाग प्रमुख

शिक्षण : –   एम.एस्सी. (zoology) बी.एड.

 अनुभव : – 

  • १३ वर्ष विज्ञान अध्यापक म्हणून विभागात कार्यरत

 शैक्षणिक कार्य : –

  • विज्ञानातील संकल्पना प्रयोगाच्या व प्रत्यक्ष कृतीतून विध्यार्थ्यापर्यंत सोप्या पद्धतीनी शिकविण्याचा  कायम प्रयत्न.
  • विज्ञान ह्या विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी दैनंदिन जीवनातील व स्वयंपाक घरातील विज्ञानातील संकल्पना मुलांना समजाव्यात म्हणून प्रयत्नशील.   
  • वैज्ञानिक दृष्टीकोन मुलांमध्ये रुजावा यासाठी सतत प्रयत्नशील.  
  • विदयालयातील अटल प्रकल्पात सहभाग.

नियमित उपक्रम

  • साप्ताहिक स्वास्थ्य परीक्षण
  • स्वास्थ्य रक्षण व बलवर्धनासाठी नित्य कर्म
  • विविध चाचण्यांच्या आधारे खेळाडूंचा मानसपट तयार करणे. शिक्षक - प्रशिक्षकांना त्याचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण देणे.
  • दैनंदिन प्रार्थना उपासना याद्वारे मुलांचा भावनिक विकास आणि संकल्प शक्तीचा विकास करणे.

प्रासंगिक उपक्रम

  • खेळ, ऋतू व प्रशिक्षण कालावधीनुसार खेळाडूला आहार मार्गदर्शन करणे.
  • खेळाडूचे पालक म्हणून पालकांचे विशेष प्रशिक्षण घेणे.
  • अभिक्षमता मापन चाचणी द्वारे व्यवसाय मार्गदर्शन करणे.
  • खेळाडूंचे वैयक्तिक समुपदेशन करणे.
  • संकल्प दिन, गुरुपौर्णिमा, क्रीडा दिन, स्वावलंबन शिबिरे इत्यादींमधून मूल्यसंस्कार रुजवणे.

खेळाडूंचे यश

  • संतोष अंबादास घाडगे - वर्ष २०१४ -१५ चा महाराष्ट्र राज्य शासनाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' माजी शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
  • सोनाली गारगोटे - ॲथलेटिक्स च्या भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड.
  • नेहा गायकवाड - रिदमिक जिमनॅस्टिकच्या भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड.
  • सत्यव्वा हळदकेरी - कबड्डीच्या भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी दोन वेळा निवड.
  • अंकिता बोडके ( कप्तान २ वेळा) रुणाली जाधव व धनश्री कदम खेलो इंडियाच्या कबड्डी संघामध्ये सहभागी.
  • भारतीय खेल प्राधिकरण SAI खेळाडू दत्तक योजनेमध्ये आठ खेळाडूंची निवड. तसेच कु. अंकिता बोडके, कु. रुणाली जाधव आणि कु. धनश्री कदम यांना खेलो इंडिया 'खेळाडू दत्तक योजनेसाठी' प्रत्येकी पाच लक्ष स्कॉलरशीप व धर्मशाला हिमाचल प्रदेश या ठिकाणी ट्रेनिंगसाठी निवड.

अध्यापकांचे यश

श्री. तुषार भरगुडे ( मल्लखांब प्रशिक्षक )

मल्लखांब प्रशिक्षक श्री. तुषार भरगुडे यांना पिंपरी-चिंचवड शहरात क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०१५ - १६ चा 'क्रीडा शिक्षक गौरव पुरस्कार ' प्रदान करण्यात आला.

श्री. भगवान सोनवणे ( कब्बडी प्रशिक्षक )

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने श्री. भगवान सोनवणे यांना २००९ साली 'आदर्श शिक्षक पुरस्कार' मिळाला.
  • राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठानतर्फे २००७ साली पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने 'उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार' प्राप्त.
  • पिंपरी चिंचवड शहर स्पोर्टस क्लबच्या वतीने २००८ साली 'उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार'
  • भारतीय खेल प्राधिकरण SAI बंगलोर तसेच भारतीय खेल प्राधिकरण SAI गांधीनगर गुजरात या ठिकाणी अभ्यास दौरा.

राज्य पातळीवरील यश

 

वर्ष सहभाग विजयी
२००३ ४३ ३१
२००४ ५८ ३३
२००५ ६० ४८
२००६ ३९ ३४
२००७ ६३ २८
२००८ ५२ ५०
२००९ ४३ २७
२०१० ६३ ६७
२०११ ८१ २६
२०१२ ७८ २९
२०१३ ७५ ४५
२०१४ ४२ २४
२०१५ ६५ २४
२०१६ ६३ २३
२०१७ ४९ १०
२०१८ ३५ ०६
२०१९ ३४ २०
२०२० २८ १४

राष्ट्रीय पातळीवरील यश

 

वर्ष सहभाग विजयी
२००३ १० १०
२००४ २० १०
२००५ २१ १४
२००६ २१ १०
२००७ १९ १६
२००८ २३ १०
२००९ १४ ०९
२०१० १५ ०७
२०११ २५ १४
२०१२ २४ १३
२०१३ २३ १०
२०१४ २८ १६
२०१५ २४ २३
२०१६ २३ ०९
२०१७ १८ १३
२०१८ १५ १३
२०१९ १६ ०८
२०२० १० ०५

छायाचित्रे