Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
औपचारिक शिक्षण विभाग इयत्ता ५ वी ते ७ वी

पूर्व माध्यमिक

विभागाची उद्दिष्टे

  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसनासाठी प्रयत्न करणे. 
  • अभिव्यक्ती विकसन योजनेद्वारे विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखणे.
  • पाठ्यपुस्तकी शिक्षणाला अनुभव शिक्षणाची जोड देणे.
  • विविध स्पर्धा व परीक्षा यांची उत्तम तयारी करून घेणे.

विभाग रचना - अध्यापक वृंद

 श्री. शिवराज पिंपुडे 

M.A. B. Ed.  
  • विभाग प्रमुख
  • इतिहास अध्यापक
  • माजी विद्यार्थी
  • २० वर्षांचा  अनुभव
  • अनुभव शिक्षणातील अनेक यशस्वी प्रयोग

श्री. समाधान सुसर 

M.A. B. Ed.  
  • सहाय्यक विभाग प्रमुख
  • मराठी व गणित विषय अध्यापक
  • नियोजनबध्द कामाची आखणी
  • गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अनुभव

सौ. स्मिता माने

M.Sc. M. Ed. B. A. (संस्कृत )
  • सहविचार समिती सदस्य
  • विज्ञान व गणित अध्यापिका 
  • माजी विद्यार्थिनी

औपचारिक शिक्षण विभाग

  • इयत्ता ५ वी ते ७ वी
  • पाचवी पासून गणित व विज्ञान या दोन विषयांचे इंग्रजी भाषेतून अध्यापन
  • इयत्ता पाचवी शासकीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अभ्यास वर्ग
  • निरीक्षण, प्रश्न, संवाद कौशल्य विकसित होण्याच्या उद्देशाने विशेष प्रयत्न
  • विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकसनाच्या दृष्टीने वर्षभर उपक्रमांची नियोजनपूर्वक रचना

अनुभव शिक्षणाच्या साथीने क्रमिक शिक्षण

  • पाठ्यपुस्तकी शिक्षणाला अनुभव शिक्षणाची नियोजनपूर्वक जोड
  • व्यक्तिमत्त्व विकसनाच्या दृष्टीने दिशादर्शक ठरणारे नाट्य, संगीत, नृत्य, वादन, हस्तकला, चित्रकलाया कलाविषयांचा परिचय व प्रशिक्षणपर नियमित तासिकांचा समावेश.
  • विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती विकसनास पोषक वातावरण व तज्ञांचे मार्गदर्शन
  • शालाबाह्य स्पर्धा परीक्षात सहभाग  आणि तयारीपूर्वक सहभाग 

विभागाची वैशिष्ट्ये

  • राखी विक्री उपक्रम
  • अभिव्यक्ती विकसनाच्या नियमित तासिका, सादरीकरणात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग
  • ३ ते ५ दिवसीय निवासी मातृभूमी परिचय शिबिर
  • क्रमिक शिक्षण संकल्पना समृद्ध करणाऱ्या क्षेत्र भेटी, तज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा
  • बाल विज्ञान राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत सलग तीन वर्षे विज्ञान प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड. सुवर्ण पदकाने सन्मानित प्रकल्प
  • NIE आयोजित नाट्य स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. नाट्य स्पर्धेची लेखन, दिग्दर्शन, उत्तम अभिनेता, अभिनेत्री अशी अनेक पारितोषिके
  • अभ्यासपूर्ण अध्ययन अध्यापन प्रक्रिया
  • प्रेरणादायी, विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेणारा, नोंद ठेवणारा, गुणात्मक शिक्षक विद्यार्थी संवाद
  • उपक्रमात पालकांचे उत्स्फूर्त सहकार्य आणि सहभाग
  • पुस्तक पेटी योजना : प्रत्येक विद्यार्थ्याने अवांतर वाचन करावे यासाठी ग्रंथालयातील पुस्तकांची वयोगटानुसार विभागणी करून पुस्तकांची उपलब्धता. या योजनेमुळे ७वितिल प्रत्येक विद्यार्थ्याचे किमान ३० अवांतर पुस्तकांचे वाचन.

विभागाचे यश

२०१९ -२० या वर्षात हे सर्व उच्चांक मोडीत काढून विद्यार्थ्यांनी अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले. यंदा ६ वी ब व क आणि ७ वी ब आणि क या चारही वर्गानी एक लक्ष रुपयांची जोरदार विक्री केली. विभागाचीही एकूण राखी विक्री रु. ५,७९,३८५ /-  इतकी भरघोस झाली. गेल्या वर्षी रु. १०५००/-  ही सर्वोच्च वैयक्तिक राखी विक्री होती. यंदा हा विक्रम एकूण सात जणांनी कु. लावण्या सोनटक्के, चि. अपूर्व बुरसे, कु. सृष्टी सुसर, कु. शार्वी कळसकर हे सहावीचे तर कु. अथिला पाटील, कु. आर्या कुलकर्णी आणि चि. अमेय शेवाळे ह्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस विक्री करत मोडीत काढला आहे आणि सर्वोच्च राखी विक्री रु. २५०००/- हा नवीन उच्चांक  सातवी ब च्या अमेय शेवाळे ह्या विद्यार्थ्याने प्रस्थापित केलेला आहे.

बाल विज्ञान राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा 

राष्ट्रीय बाल विज्ञान प्रकल्प स्पर्धा जिल्हा स्तरावर सायन्स पार्क चिंचवड येथे २० नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या प्रकल्पात इयत्ता सातवीच्या ओजस कोळंबे आणि देवश्री जाडकर यांनी शाकाहारी अन्नघटकांचा वापर करून जीवनसत्त्व B12 चा अर्क तयार करणे हा प्रकल्प सादर केला. जिल्हा स्तरीय,विभागीय स्तरावर निवड होत होत हा प्रकल्प राज्यस्तरावर पोहचला आणि जुन्नर येथे सादर करण्यात आलेल्या एकूण ८४ प्रकल्पांमधून या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. २७ डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत त्रिवेंद्रम, केरळ येथे या प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. या प्रकल्पास डॉ. दीप्ती धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले होते. सौ. स्मिता माने यांनी प्रकल्पास सहाय्य केले. विभागप्रमुख श्री. शिवराज पिंपुडे यांनी प्रकल्पास आवश्यक ती सर्व मदत उभी करून दिली.

छायाचित्रे

कार्यशाळा, क्षेत्र भेटी

  • परिसरातील वृक्षांची  शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी वृक्ष परिचय कार्यशाळा आयोजित करण्यात येत असते
  • स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करण्याच्या हेतूने भिगवण परिसरात पक्षी निरीक्षण सहल आयोजित करण्यात येते.
  • निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित देवराई चा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात येतो
  • अशा प्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक नेले जाते

अध्यापक स्तर

  • IISER येथे होणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत सौ. स्मिता माने यांची द्वितीय स्तरावर निवड झाली. ४५ व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत शैक्षणिक साधने अंतर्गत DNA आराखडा व पेशी रचना याचे मॉडेल तयार करून स्पर्धेत सहभाग नोंदवला.
  • DICPD पुणे आणि शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे आयोजित  'शिक्षण परिषदेत' दि. २७/११/१९ श्री.समाधान सुसर हे सुलभक(प्रशिक्षक) म्हणून गेले होते. या शिक्षण परिषदेत ६० ते ६५ अध्यापक सहभागी होते.. माझा वर्ग-माझा उपक्रम' या सत्रात त्यांनी 'राखीविक्री उपक्रमाबाबत' मांडणी केली. तसेच 'आकारिक व संकलित मूल्यमापन' कसे केले जावे याबाबत मार्गदर्शन केले.