Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

संवेद विभाग

विभागाची उद्दिष्टे

  • विद्यार्थ्यांच्या विकासातील अडथळे दूर करणे
  • विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून देण्यास मदत करणे
  • विद्यार्थ्यांच्या विकासात अध्यापक व पालकांचे साहाय्य
  • विशेष गरजा असणारे व विशेष क्षमता असणारे विद्यार्थी शोधणे, त्यासाठी मार्गदर्शन करणे
  • कुमारवयातील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणाचे नियोजन

विभागातील सदस्य

  • अस्मिता बारसावडे – B. HSc. बाल मानसशास्त्र , Diploma (शालेय मानसशास्त्र), M.A. (समुपदेशन मानसशास्त्र)
  • मनीषा खोपडे - M.A. (वैद्यकीय मानसशास्त्र), Diploma (शालेय मानसशास्त्र)
  • रागिणी पवार - M.A. (समुपदेशन मानसशास्त्र), Diploma (मार्गदर्शन, समुपदेशन)

विभागाच्या कामाचे स्वरूप

  • पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग या दोन विभागांमध्ये वर्ग निरीक्षणे, व आवश्यकते नुसार पालकांसह समुपदेशन
  • पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्गांमधून जाऊन बोलणे, वेगवेगळ्या विषयांची मांडणी करणे व आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक बोलणे व गरज लागल्यास पालकांशी बोलणे.
  • आठवी ते दहावी च्या वर्गांमध्ये वेगवेगळे विषय घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद व प्रामुख्याने मुलांच्या प्रश्नांबद्दल वैयक्तिक मुलांशी संवाद साधून प्रश्न सोडवण्यावर भर असेल.

विभागात चालणारी कामे

१. वर्गशः निरीक्षणे:

शिशुवर्ग ते चौथी पर्यंतच्या वर्गांची निरीक्षणे. या निरीक्षणांमध्ये खालील बाबी लक्षात घेतल्या जातात.

  • विद्यार्थ्यांची आकलनक्षमता
  • वयोगटानुसार होत असलेले बदल
  • वर्तणूक समस्या असलेले विद्यार्थी
  • लिखाण व वाचनामध्ये मागे पडणारे विद्यार्थी
  • प्रतिभासंपन्न विद्यार्थी

२. समुपदेशन:

  • विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार समुपदेशन
  • अध्यापक व पालक यांची मदत
  • शिशुवर्ग ते चौथी पालकांसह समुपदेशन
  • पाचवी ते सातवी मुख्यतः विद्यार्थी समुपदेशन व आवश्यकतेनुसार पालक सहभाग
  • आठवी ते दहावी विद्यार्थी समुपदेशन
  • पालक, विद्यार्थी व अध्यापक यांच्यासाठी समुपदेशन हेल्पलाइन चालवणे

३. विद्यार्थी संवाद:

  • मुख्यतः ५वी पासून पुढचा गट
  • भावनिक विकसन, मैत्री, नातेसंबंध, गटबांधणी , इ. सारखे विषय या मध्ये असतील.
  • सातवी पासून पुढच्या वयोगटासाठी सामाजिक विकासानावर भर असणाऱ्या उपक्रमांचे नियोजन.

४. अध्यापक व पालक सहभाग:

  • विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या वागण्या बोलण्यातून समान जाणवणाऱ्या विषयांसाठी पालक प्रशिक्षणाचे आयोजन.
  • पालक बैठका व अध्यापक भेटी या द्वारे मुख्यतः मुलांपर्यंत पोहोचणे.
  • सत्रासाठी मानसशास्त्रा विषयी, पालकत्व(वयोगटानुसार), इ. विषयांचा सहभाग.
  • पालक महासंघाच्या सोबत प्राथमिक पूर्व माध्यमिक व माध्यमिक विभागात विद्यार्थ्यांसाठी वर्गमित्र ही संकल्पना राबवणे.

५. अभिक्षमता मापन:

  • १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अभिक्षमता मापन चाचणी घेणे.

छायाचित्रे

भविष्यातील उपक्रम

  • दहावी, बारावी साठी अभिक्षमता चाचणी नंतर करियर counselling सुरू करणे.
  • निरंतर बालविकास (मोहोर) सत्र शाळेशिवाय सुरु करणे.
  • शिशुप्रज्ञा, बुद्धिमापन व iTAP या चाचण्या वयोगटानुसार घेणे.