Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

धडपड प्रयोगशाळा

विभागाची वैशिष्ट्ये

  • शालेय वयातील मुलांना नाविन्यपूर्ण प्रयोगांची सवय लागावी म्हणून धडपड प्रयोशाळेची कल्पना राबवण्यात आली.
  • पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देणे.
  • सर्वांगीण विकास
  • सर्व शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत तासिका निश्चित करण्यात आल्या आहेत.
  • मुलांना सुतारकाम, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, 3-D प्रिंटिंग, प्रोग्रामिंग इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देणे.
  • विविध प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आऊट-ऑफ बॉक्स विचार करण्यासाठी उद्युक्त करणे.
  • विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवण्यासाठी योगदान देणे.

विभाग रचना - अध्यापक वृंद

  • श्री.कल्पेश कोठाळे - विभागप्रमुखकल्पेशदादा मेकॅनिकल इंजिनिअर असून गेली अनेक वर्ष तो मुलांना धडपड प्रयोगशाळेसाठी मार्गदर्शन करत आहे.
  • श्री. रोहित महाडदळकर - समन्वयक आणि मार्गदर्शकरोहित सरांना, १८ वर्ष आय.टी. क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी अनेक वर्ष परदेशात सुद्धा काम केले आहे.
  • सौ. शिवानी पुलसे - इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षकशिवानी ताई इलेक्ट्रॉनिक्स विषयात पारंगत असून ५ वर्षाचा अनुभव आहे.
  • श्री. आकाश गायकवाड - सुतारकाम प्रशिक्षकआकाशदादाने सुतारकामाचे प्रशिक्षण घेतले असून ते मुलांना सुतारकामाची ओळख करून देतात

विभागाची वैशिष्ट्ये व सुविधा

सर्व शैक्षणिक विभागातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत तासिका निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आपल्या नेहमीच्या अटल च्या तासांव्यतिरिक्त प्रयोगशाळेत येऊन विविध प्रकल्प करत असतात. विद्यार्थ्यांना खालील विषयात प्रशिक्षण दिले जाते -
  • Basic electronics component and its uses
  • Arduino Programming and arduino circuits
  • 3-D printing
  • Mechanical engineering concepts
  • Carpentry
  • Design thinking and problem solving techniques.
  • Soldering, circuit design and solving real life problems

उपक्रम

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात हे वर्ष विशेष अभिरूची वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. ह्या निमित्ताने धडपड प्रयोगशाळेतर्फे विविध स्पर्धा आणि वर्कशॉप घेण्यात आले.
  • गणेशोत्सवात विविध सामाजिक विषयानुसार स्पर्धा आयोजन
  • सुतारकाम वर्कशॉप
  • डिझाईन थिंकिंग स्पर्धा आणि वर्कशॉप
  • सायन्स दिवस स्पर्धा
  • ह्या व्यतिरिक्त नियमितपणे इलेक्ट्रॉनिक्स, सुतारकाम आणि मेकॅनिकल विषयांच्या विविध कार्यशाळा घेण्यात आल्या. मुलांना नेहरू सायन्स सेंटर आणि IISER पुणे इथे क्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात आले
  • मुलांना जैवविविधता आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे म्हणून थंडीच्या दिवसात भिगवण येथे पक्षीनिरिक्षणासाठी नेण्यात आले.