ज्ञान प्रबोधिनी हा सतत चालू असणारा अभिनव शैक्षणिक प्रयोग आहे. या शैक्षणिक प्रयोगामध्ये १९९७ साली, शिक्षणतज्ज्ञ वाच. वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ यांनी भारतीय शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या ‘पंचकोशाधारीत गुरुकुल’ या प्रकल्पाची पायाभरणी केली. गुरुकुलामध्ये उपनिषदांमध्ये मांडलेल्या व्यक्तीविकासाच्या पाचकोशांवर आधारित दिनचर्या, उपक्रमांची रचना मांडली आहे. गुरुकुलाच्या २५ वर्षांहून अधिक झालेल्या वाटचालीमध्ये ही शिक्षण प्रणाली आता अनुभवसिद्ध होत गेली आहे. अध्यापक, पालक, समाज आणि स्वतः विद्यार्थी अशा सर्वांच्या योगदानातून ही रचना यापुढेही यशस्वी वाटचाल करीत राहील.
राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याचे सलग १००० सूर्यनमस्कार
सायकल सहल सरासरी २०० किमी.
प्रकृती परीक्षण व वैद्यांचे मार्गदर्शन
नियमित पाठांतराचे इयत्ता निहाय महिन्याचे वेळापत्रक
पोहणे प्रशिक्षण वर्ग
एप्रिल महिना उन्हाळी छंदवर्ग
राखी विक्री
संस्कार उपक्रम : विद्यारंभ, विद्याव्रत
स्वतंत्र ग्रंथालय
मातृभूमी परिचय शिबिर – जिल्हा ते सीमावर्ती राज्य
विविध जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते.
गोकुळाष्टमी
संत चरित्र कथन
दासबोध पारायण व ज्ञानेश्वरी वाचन
वार्षिक प्रकल्प
क्षेत्रभेटी
चिंतनिका
नियमित मौनाभ्यास
स्वयं अध्ययन कौशल्य प्रशिक्षण
अटल प्रशिक्षण
दैनंदिन उपासना
दैनंदिन स्वच्छता
शिबिरात श्रमदान
सेवाशिबिरे
श्रावणी सोमवार