ज्ञान प्रबोधिनी हा सतत चालू असणारा अभिनव शैक्षणिक प्रयोग आहे. या शैक्षणिक प्रयोगामध्ये १९९७ साली, शिक्षणतज्ज्ञ वाच. वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ यांनी भारतीय शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या ‘पंचकोशाधारीत गुरुकुल’ या प्रकल्पाची पायाभरणी केली. गुरुकुलामध्ये उपनिषदांमध्ये मांडलेल्या व्यक्तीविकासाच्या पाचकोशांवर आधारित दिनचर्या, उपक्रमांची रचना मांडली आहे. गुरुकुलाच्या २५ वर्षांहून अधिक झालेल्या वाटचालीमध्ये ही शिक्षण प्रणाली आता अनुभवसिद्ध होत गेली आहे. अध्यापक, पालक, समाज आणि स्वतः विद्यार्थी अशा सर्वांच्या योगदानातून ही रचना यापुढेही यशस्वी वाटचाल करीत राहील.