ज्ञानप्रबोधिनी ही संस्था शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करणारी संस्था आहे. निगडी येथील नवनगर विद्यालयात जून 1998 मध्ये खेळाडू घडवणाऱ्या
क्रीडाकुल विभागाची सुरुवात करण्यात आली.खेळाडूंची शाळा ही संकल्पना संपूर्ण नव्याने या ठिकाणी विकसित केली गेली. दरवर्षी अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते खेळाडू तयार होत आहेत. विविध खेळांचे प्रशिक्षक , क्रीडा मानस, क्रीडा वैद्यक इ. विषयातील तज्ज्ञांना सोबत घेऊन खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा अभ्यासक्रम तयार होत आहे. क्रीडा हे व्यक्तिमत्व विकासाचे उत्तम साधन बनू शकते असा विश्वास गेली 25 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात काम करताना जाणवत आहे. सध्या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण, आरोग्य, मानस आणि शिक्षण हे विभाग कार्यरत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात इयत्ता पाचवी ची प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यानुसार यावर्षीची प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
संपर्क –
प्रिया कोल्हटकर, संपदा कुलकर्णी