शैक्षणिकवर्ष २०१७-१८ हे निगडी केंद्राचे संगीत वर्ष होते. त्या निमित्ताने “संगीत संमेलनाचे” आयोजन केले होते.
पं. रामदास पळसुले अध्यक्षपदी होते, तर प्रसिद्ध शास्त्रीय गायक – श्री. समीर दुबळे उपाध्यक्ष होते.
डॉ. विकास कशाळकर यांनी संमेलनाला मार्गदशन केले. डॉ. पौर्णिमा धुमाळे (गायन), पं. प्रमोद मराठे (संवादिनी), डॉ.पं.नंदकिशोर कपोते (नृत्य) ,राष्ट्रीय कीर्तनकार – चारुदत्त आफळे , डॉ. सलील कुलकर्णी (दैनंदिन जीवनातील संगीत) , पं. मिलिंद तुळणकर (जलतरंग-संतूर) ,पं.प्रमोद गायकवाड (सुंद्री,सनई) आदी मान्यवरांनी संगीत सादरीकरणातून, विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याद्वारे विद्यार्थ्यांना, संगीत क्षेत्रातील क्षितिज काय असावे, हे समजण्यास मदत झाली. शास्त्रीय गायन , सुगम संगीत , भरतनाट्यम , कथक , संवादिनी , तबला , तालवाद्य , प्रबोधन गीते आदी विषयांच्या बारा समांतर कार्यशाळा विद्यार्थ्यांनी अनुभवल्या.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये शतगानवंदना, २०१९-२० मध्ये संतवाणी, २०२०-२१ मध्ये प्रकाशगाणी (ऑनलाईन), २०२२-२३ मध्ये गाणं कवितेचं (ऑनलाईन), २०२३-२४ मध्ये देवगाणी, २०२४-२५ मध्ये निसर्गगाणी यासारख्या खुल्या सांगीतिक स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रतिवर्षी ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी गायन व नृत्य सादर करत या सर्व स्पर्धा यशस्वी केल्या.
संक्रांत ते रथसप्तमी दरम्यान एका रविवारी सूर्योदय ते सूर्यास्त अखंड संगीत यज्ञाचे आयोजन केले जाते ज्यात गायन- वादन – नृत्य – नाट्य सादर होते.
मुक्तिसोपानने PCET Infinity (९०.४ FM) बरोबर ‘वह्नि तो चेतवावा’ ह्या प्रकल्पात ५२ देशभक्तीपर गीते तसेच स्फूर्तीगीतांचे ध्वनिमुद्रण केले. १४ शाळांतील सुमारे २०५ विद्यार्थी, ८ तबला वादक, १३ संवादिनी वादक, ७ तालवाद्य वादक, १२ मार्गदर्शक अध्यापक अशा २५० जणांनी या प्रकल्पात योगदान दिले
मुक्तिसोपान विभाग २००५-०६ या शैक्षणिक वर्षात सुरु झाला. २००५ सालची “दिवाळी पहाट”, हि पहिली संगीत सभा. तेव्हापासून अव्याहतपणे प्रतिवर्षी धनत्रयोदशीला “दिवाळी पहाट” या शास्त्रीय – उपशास्त्रीय संगीत सभेचे आयोजन करण्यात येते.
सुश्री. आरती अंकलीकर टिकेकर, सुश्री. सानिया पाटणकर, पं. शौनक अभिषेकी, श्री. कौस्तुभ कांती गांगुली, गायिका अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आदी संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी या दिवाळी पहाट सभेचे व्यासपीठ भूषविले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये मुक्तिसोपान सदस्या – स्वरेशा पोरे कुलकर्णी, यांनी सादर केलेली दिवाळी पहाट संगीत सभा म्हणजे मुक्तिसोपानच्या शिरपेचातील मानाचा तुरा.
यंदाच्या २0 व्या दिवाळी पहाट स्वरमैफिलीत पुणे येथील सौरभ काडगावकर यांनी आपली कला सादर केली. दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ (धनत्रयोदशी) रोजी सकाळी ६:३० ते ८.३० या वेळात मनोहर वाढोकर सभागृहात हि स्वरमैफिल संपन्न झाली. गेली १९ वर्षे ही परंपरा सुरू असून दिवाळीची मंगलमय प्रभात आनंदमय व्हावी , आप्तजनांच्या मेळाव्यात सांगीतिक मैफिल ऐकल्यानंतर एकत्रित दिवाळी फराळाचा आनंद लुटावा या उद्देशाने प्रतिवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी विद्यालयात या संगीत सभेचे आयोजन केले जाते.