शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उपकरण विभागात फोरमन म्हणून कार्यरत असताना १९८० रोजी निगडी येथे राहण्यासाठी आले. येथील परिसरात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेसाठी पिंपरी किंवा पुणे शहरात जावे लागे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर प्राधिकरण सुरु व्हावी म्हणून निगडी प्राधिकरण कडून निगडी येथे साडे चार एकर जागा मिळवून दिली. निगडी प्रबोधिनीत व्यवस्थापक म्हणून अनेक वर्ष काम पहिले, या बरोबर विदभातील लोकांसाठी विदर्भ सहयोग मंडळ स्थापन केलं, मंडळासाठी २० गुंठे जागा मिळवून दिली , गजानन महाराज मंदिर स्थापन व्हावे म्हणून मोलाची कामगिरी निभावली, एल आय जी कॉलनीत गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून मंडळ स्थापन करून, हनुमानाचे भव्य मंदिर स्थापन केले.
अनेक वर्ष कित्येक कार्यकर्त्यांना घेऊन, ब्रह्मगिरी ची २७ किमी प्रदक्षिणा श्रावण महिन्यात पूर्ण करतात.
वयाच्या ७०व्या वर्षी सलग ७० किमी चालण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यानंरच्या वर्षात म्हणजे ७१ व्या वर्षी निगडीहून भीमाशंकरला जाऊन परत चालत येण्याचा १०० किमीचा देखील विक्रम त्यांनी केला.
नारायण हट संस्थेचे १५ वर्ष सचिव म्हणून काम पहिले. गेली २७ वर्ष मातृमंदिर विश्वस्थ संस्थेचे कित्येक वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहून महाराष्ट्रातील अनेक शाळांबरोबर मैत्रीचे नाते जोडले.
विदर्भात आदिशक्ती मातेचे मंदिर स्थापण करण्यासाठी मंदिरसमितीचे आधारस्तंभ म्हणून काम पाहतात.
COVID 19 मध्ये ग्रामीण भागात डॉक्टरांबरोबर घरोघरी जाऊन लोकांना औषधे, उपायीगी सामग्री पुरवली.
विदर्भात रुक्मिणीचे माहेरअसलेल्या कौडण्यपूर येथे पंचकन्या विद्यापीठ स्थापन व्हावे म्हणून सध्या प्रयत्न चालू आहेत.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळवा, ग्रामीण भागात उद्योग निर्माण व्हावा, शेतकरी स्वावलंबी व्हावा म्हणून ग्रामविकासनाचे काम चालू आहे.