मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, सणसमारंभ माहिती व्हावे या उद्देशाने आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, दीपपूजन, नागपंचमी, दहीहंडी, राखीपौर्णिमा, हरतालिका, गणेशोत्सव, भोंडला, दिवाळी, संक्रात असे सर्वच सण साजरे झाले. हे सण साजरे करताना जुन्या नव्याचा योग्य संगम करण्यासाठी त्याला कालानुरुप गोष्टी मुलांना सांगितल्या. जसे दीपपूजनाला रोजच्या वापरातील ट्यूब, बल्ब स्वच्छ करावे, वीज जपून वापरावी हे सांगून, राखीपौर्णिमेला रिक्षावाले, स्वच्छता कर्मचारी काकांना राखी बांधून आधुनिक विचारांची जोड दिली तर कधी उपक्रमास साजेसे खेळही घेतले.