विद्यार्थ्यांच्या विकासात अध्यापक व पालकांचे साहाय्य
विशेष गरजा असणारे व विशेष क्षमता असणारे विद्यार्थी शोधणे, त्यासाठी मार्गदर्शन करणे
कुमारवयातील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणाचे नियोजन
विभागातील सदस्य
अस्मिता बारसावडे – B. HSc. बाल मानसशास्त्र , Diploma (शालेय मानसशास्त्र), M.A. (समुपदेशन मानसशास्त्र)
मनीषा खोपडे - M.A. (वैद्यकीय मानसशास्त्र), Diploma (शालेय मानसशास्त्र)
रागिणी पवार - M.A. (समुपदेशन मानसशास्त्र), Diploma (मार्गदर्शन, समुपदेशन)
विभागाच्या कामाचे स्वरूप
पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग या दोन विभागांमध्ये वर्ग निरीक्षणे, व आवश्यकते नुसार पालकांसह समुपदेशन
पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्गांमधून जाऊन बोलणे, वेगवेगळ्या विषयांची मांडणी करणे व आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक बोलणे व गरज लागल्यास पालकांशी बोलणे.
आठवी ते दहावी च्या वर्गांमध्ये वेगवेगळे विषय घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद व प्रामुख्याने मुलांच्या प्रश्नांबद्दल वैयक्तिक मुलांशी संवाद साधून प्रश्न सोडवण्यावर भर असेल.
विभागात चालणारी कामे
१. वर्गशः निरीक्षणे:
शिशुवर्ग ते चौथी पर्यंतच्या वर्गांची निरीक्षणे. या निरीक्षणांमध्ये खालील बाबी लक्षात घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांची आकलनक्षमता
वयोगटानुसार होत असलेले बदल
वर्तणूक समस्या असलेले विद्यार्थी
लिखाण व वाचनामध्ये मागे पडणारे विद्यार्थी
प्रतिभासंपन्न विद्यार्थी
२. समुपदेशन:
विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार समुपदेशन
अध्यापक व पालक यांची मदत
शिशुवर्ग ते चौथी पालकांसह समुपदेशन
पाचवी ते सातवी मुख्यतः विद्यार्थी समुपदेशन व आवश्यकतेनुसार पालक सहभाग
आठवी ते दहावी विद्यार्थी समुपदेशन
पालक, विद्यार्थी व अध्यापक यांच्यासाठी समुपदेशन हेल्पलाइन चालवणे
३. विद्यार्थी संवाद:
मुख्यतः ५वी पासून पुढचा गट
भावनिक विकसन, मैत्री, नातेसंबंध, गटबांधणी , इ. सारखे विषय या मध्ये असतील.
सातवी पासून पुढच्या वयोगटासाठी सामाजिक विकासानावर भर असणाऱ्या उपक्रमांचे नियोजन.
४. अध्यापक व पालक सहभाग:
विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या वागण्या बोलण्यातून समान जाणवणाऱ्या विषयांसाठी पालक प्रशिक्षणाचे आयोजन.
पालक बैठका व अध्यापक भेटी या द्वारे मुख्यतः मुलांपर्यंत पोहोचणे.
सत्रासाठी मानसशास्त्रा विषयी, पालकत्व(वयोगटानुसार), इ. विषयांचा सहभाग.
पालक महासंघाच्या सोबत प्राथमिक पूर्व माध्यमिक व माध्यमिक विभागात विद्यार्थ्यांसाठी वर्गमित्र ही संकल्पना राबवणे.
५. अभिक्षमता मापन:
१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अभिक्षमता मापन चाचणी घेणे.
छायाचित्रे
भविष्यातील उपक्रम
दहावी, बारावी साठी अभिक्षमता चाचणी नंतर करियर counselling सुरू करणे.
निरंतर बालविकास (मोहोर) सत्र शाळेशिवाय सुरु करणे.
शिशुप्रज्ञा, बुद्धिमापन व iTAP या चाचण्या वयोगटानुसार घेणे.