२६ तारखेपासून युवक विभागाच्या महाविद्यालयीन गटाच्या क्रीडा स्पर्धा सुरू झाले. दरवर्षी दोन्ही युवक दलांवर नियमित येणारे युवक या मध्ये सहभागी होत असतात. या वर्षी ६० युवक ५ वेगवेगळ्या पथकांमधून स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहेत.
प्रत्येक दलावर पथकांनुसार होणारे खेळ, यातून आपल्या संघाची होणारी ओळख, शक्तीस्थाने आणि कमजोर जागांचा अभ्यास त्यानुसार होणारी व्यूहरचना या सर्वांची छान तयारी मागच्या ६ महिन्यात सर्व संघांची झाली आहे. त्यातून एकूण ४ दिवसात ७ वेगवेगळे खेळ खेळले जातील आणि यावर्षीचे विजयी पथक कोणते ते निश्चित होईल.
उत्तमतेचे एक एक पाऊल पुढे जात स्पर्धेचे हे सलग ६ वे वर्ष आहे. अनेक प्रयोग करता येणे, नवीन जबाबदार युवकांच्या प्रशिक्षणाची जागा, संघ भावना दृढ करणारी रचना, वय वर्ष १६ ते वय वर्ष ३१ अशा मोठ्या range मध्ये मैदानावर एकत्र दिसणारे युवक. ही आणि अशी अनेक वैशिष्ट्ये स्पर्धेची सांगता येतील.