युवतींमधील सामाजिक जाणीव आणि नेतृत्व गुण वाढण्यासाठीचे उपक्रम
संघटनात्मक रचना
शालेय गट सहविचार समिती
महाविद्यालयीन गट सहविचार समिती
विभागाचे वृत्त लेखन व दस्तऐवजीकरण
अन्य गट
मार्गदर्शक
छायाचित्रे
नियमित उपक्रम
साप्ताहिक बैठक - आठवड्यातून एक दिवस नियमित गटाची बैठक होते. त्यामध्ये काही प्रेरक वाचन, चालू उपक्रम, कार्यक्रम आणि दलांचे नियोजन होते.
युवतींसाठी चालणारे पाक्षिक दल - ११ वी ते पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी दर पंधरा दिवसांनी दल योजले जाते. या युवतींच्या समूहगुण विकसन आणि सामाजिक जाणीव संवर्धन यासाठी नियमित उपक्रम योजले जातात.
शालेय विद्यार्थिनींसाठी चालणारे साप्ताहिक दल - नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचा पुढचा टप्पा म्हणून दलांवर या विद्यार्थिनींना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. इयत्ता ९वीच्या विद्यार्थिनींना प्रबोधिनीची अधिकाधिक ओळख करून दिली जाते.
साप्ताहिक दलातील उपक्रम
शाडू मातीचा गणपती, घोराडेश्वर येथील वृक्षारोपण , बरचीचे रंगकाम करताना तसेच वेल्हे येथील ग्रामीण शिबिरात शालेय दलाच्या मुली.
साप्ताहिक दलातील उपक्रम
नागरी वस्ती मध्ये साप्ताहिक दल - परिसरातील बिजलीनगर येथील नागरीवस्तीमधील ७वी ते १०वीच्या गटातील मुलींच्या व्यक्तिमत्व विकसनासाठी कला दल आणि क्रीडा दल या माध्यमातून प्रयत्न केले जातात..
महत्वाचे उपक्रम - नेतृत्व प्रशिक्षण शिबिर
शालेय दलाच्या सुरुवातीला जून मध्ये युवती ९ वी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या मुलींचे नेतृत्वगुण परिचय आणि अनुभवाचे ८-१० दिवसांचे निवासी शिबिर आणि त्यानंतर पावसाळ्यात गिर्यारोहण आयोजित करतात.
वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम – अभ्यास दौरे
आपल्या मातृभूमीचा अधिकाधिक जवळून परिचय व्हावा. विविधतेतील एकता अनुभवता यावी. या उद्देशाने युवतींचे वेगवेगळ्या राज्यात दौरे आयोजित केले जातात.
“
वैशिष्ट्यपूर्णउपक्रम – गणेशोत्सव
श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा
मिरवणुका आणि प्रात्यक्षिके
ज्ञान प्रबोधिनी : गणपती विसर्जनाचे स्थिर प्रात्यक्षिक