२०१९ -२० या वर्षात हे सर्व उच्चांक मोडीत काढून विद्यार्थ्यांनी अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले. यंदा ६ वी ब व क आणि ७ वी ब आणि क या चारही वर्गानी एक लक्ष रुपयांची जोरदार विक्री केली. विभागाचीही एकूण राखी विक्री रु. ५,७९,३८५ /- इतकी भरघोस झाली. गेल्या वर्षी रु. १०५००/- ही सर्वोच्च वैयक्तिक राखी विक्री होती. यंदा हा विक्रम एकूण सात जणांनी कु. लावण्या सोनटक्के, चि. अपूर्व बुरसे, कु. सृष्टी सुसर, कु. शार्वी कळसकर हे सहावीचे तर कु. अथिला पाटील, कु. आर्या कुलकर्णी आणि चि. अमेय शेवाळे ह्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस विक्री करत मोडीत काढला आहे आणि सर्वोच्च राखी विक्री रु. २५०००/- हा नवीन उच्चांक सातवी ब च्या अमेय शेवाळे ह्या विद्यार्थ्याने प्रस्थापित केलेला आहे.
राष्ट्रीय बाल विज्ञान प्रकल्प स्पर्धा जिल्हा स्तरावर सायन्स पार्क चिंचवड येथे २० नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या प्रकल्पात इयत्ता सातवीच्या ओजस कोळंबे आणि देवश्री जाडकर यांनी शाकाहारी अन्नघटकांचा वापर करून जीवनसत्त्व B12 चा अर्क तयार करणे हा प्रकल्प सादर केला. जिल्हा स्तरीय,विभागीय स्तरावर निवड होत होत हा प्रकल्प राज्यस्तरावर पोहचला आणि जुन्नर येथे सादर करण्यात आलेल्या एकूण ८४ प्रकल्पांमधून या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. २७ डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत त्रिवेंद्रम, केरळ येथे या प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. या प्रकल्पास डॉ. दीप्ती धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले होते. सौ. स्मिता माने यांनी प्रकल्पास सहाय्य केले. विभागप्रमुख श्री. शिवराज पिंपुडे यांनी प्रकल्पास आवश्यक ती सर्व मदत उभी करून दिली.