आई – “मग यंदा दहावी ना ? अभ्यास एकदम जोरात ना यावर्षी? दादा सारखंच मेडिकलला जाणार वाटतं?
मुलगी – “अजिबात नाही ! माझी आवड पूर्णपणे वेगळी आहे.. मला गाणं शिकायचंय.. अभिनयात करिअर करायचंय !माझं स्वप्न आहे ते मोठं!” पण हे सगळं मी कस जमवून आणू ? मला यासाठी मार्गदर्शन हवंय खर तर !”
काय.. ओळखीचा वाटतोय ना हा संवाद ? 😊 अगदी तुमच्या आमच्या घरात घडणारा .. हो ना?
अभिनय, नृत्य, नाट्य, वादन चित्रकला आणि अजूनही बरंच काही…. असं मुलांना करायचं खूप काही असतं हो! नेहमीच्या चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा… वेगळं काहीतरी!!!
मात्र यासाठी जोड हवी असते ती योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची. आयुष्याच्या या वळणावर योग्य दिशा मिळणं अतिशय गरजेचं असतं!
आणि याचसाठी ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आपल्यासाठी घेऊन येत आहे.. 👇👇
आपल्या व्याख्यानमालेतील पुष्प २० वे ..
विषय- कला क्षेत्रातील आव्हाने आणि संधी
वक्ते – प्रसिद्ध रंगकर्मी, श्री योगेश सोमण
दि. १ नोव्हेंबर ,रविवारी संध्याकाळी ५ वाजता आपण सगळेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अतिशय माहितीपर व्याख्यानाचा आनंद घेऊयात . (अर्थातच झूम किंवा YouTube वर)
https://www.youtube.com/c/JPNVNigdi
(आजच वरची लिंक subscribe करा आणि बेल 🔔 आयकॉन वर क्लिक करून ठेवा)
कार्यकारी समिती
पालक महासंघ