सस्नेह निमंत्रण !
ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात – आरोग्य शिक्षण, कला शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणासाठी वास्तूविस्ताराचे काम अनेकांच्या सहकार्याने पूर्ण झाले आहे या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आणि परमेश्वररुपी बालगोपाळांना ही वास्तू समर्पित करण्याकरिता हा सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये आपण सर्वांना दूरस्थरुपी (online) सहभागी होण्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण!
मनोज देवळेकर गिरीशराव बापट
केंद्रप्रमुख निगडी केंद्र संचालक
ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र
हर्षदराय रतिलाल कारीआ कलाभवन उद्घाटन सोहळा
सोमवार सौर ज्येष्ठ ३१ शके १९४३, २१ जून २०२१
वेळ: सकाळी ९.०० ते १०.३०
क्रीडादालनाचे उद्घाटन (चौथा मजला)
रायफल शूटिंग, योग, टेबल टेनिस, कबड्डी यांसाठी अद्ययावत कक्ष
प्रमुख पाहुणे: माननीय श्री दत्तात्रय निकम (CFO Mahindra Vehicle Manufacturer Ltd.)
विशेष अतिथी: माननीय श्री प्रशांत अय्यंगार (BKS अय्यंगार योग संस्था)
अध्यक्ष: माननीय श्री मोहनराव गुजराथी
वेळ:सायंकाळी ५.०० ते ६.३०
कलादालनाचे उद्घाटन (तिसरा मजला)
चित्र – हस्त – नाट्य – संगीतादी ८ कलांसाठी स्वतंत्र कक्ष
प्रमुख पाहुणे: माननीय श्री अनंत चिंचोळकर (Head-HR, IR & Admin KTFL)
अध्यक्ष: माननीय श्री सुभाष राव देशपांडे (कार्यवाह – ज्ञान प्रबोधिनी)
मुख्य उद्घाटन सोहळा
मंगळवार सौर आषाढ १ शके १९४३, २२ जून २०२१
वेळ: सकाळी १०.३० ते १२.३०
इमारतीचे नामकरण आणि प्राथमिक विभागाच्या वर्गांचे उद्घाटन (दुसरा मजला)
प्राथमिकसाठी स्वतंत्र ८ वर्गखोल्या
प्रमुख पाहुणे: माननीय श्री नितीन भाई कारीआ (Ratilal Bhavan Construction Co.)
माननीय श्री पार्थ मुखर्जी (Project Manager, Janaki Devi GVS)
माननीय श्री संजय कुलकर्णी (President Fleetguard filters Pvt. Ltd.)
अध्यक्ष: माननीय श्री गिरीशराव बापट (संचालक, ज्ञान प्रबोधिनी)
कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक https://youtube.com/JPNVnigdi