Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
shri manoj deolekar sir
deolekarsir@jpnvnigdi.org

मा. मनोज देवळेकर सर

केंद्रप्रमुख, ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र

व्यावसायिक अर्हता 

  • O.C. (International Olympic Committee) द्वारा आयोजित Solidarity Course
  • पतियाळा येथील अथलेटिक्स I.S प्रमाणपत्र वर्ग ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण
  • एम.सी.सी प्रशिक्षण पूर्ण
  • अथलेटिक्स राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण
  • कबड्डी जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्ण

Biography

क्रीडा अभ्यासासाठी परदेश दौरे –

  • २००३ इंग्लंड येथे शाळा, महाविद्यालये, क्लब यांतील क्रीडा व शा. शिक्षणाचा अभ्यास.
  • २००७ अमेरिका येथे २१ दिवसांचा अभ्यास दौरा
  • २०१२ लंडन ऑलिंपिक अभ्यास दौरा

शाळेतील क्रीडा शिक्षणातील काम

  • ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे १९८९ जून ते आजपर्यंत गेली २७ वर्ष शारीरिक शिक्षण व गणित विषय अध्यापक म्हणून जवाबदारी.
  • विद्यालयातील सर्व १२०० विद्यार्थ्याचे दैनंदिन शिक्षण व्हावे याकरिता विशेष योजना अभ्यासपूर्वक तयार करून गेली १५ वर्ष त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या चालू आहे. याकरिता विद्यालयातील अन्य विषय अध्यापकांचे सहकार्य मिळवले. विद्यालयातील विषय शिक्षक मैदानावर मुलांच्या बरोबर खेळ घेण्यासाठी पुढे असतात.
  • बर्ची नृत्य हे पौरुषसंपन्न नृत्य विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांना दरवर्षी शिकवून त्याचे गणेश उत्सवामध्ये विविध मंडळासमोर प्रात्यक्षिक सादर. त्यातून मिळणाऱ्या अर्थोत्पादानाद्वारे विद्यालयाचा क्रीडा विभाग स्वावलंबी करण्याचा प्रयत्न.
  • फटाके विक्री, राखी विक्री इ. उपक्रम विद्यालयात राबवून त्यातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे प्रशिक्षण तसेच क्रीडा विभागासाठी अर्थोत्पादान.
  • उन्हाळी व हिवाळी सुट्टीमध्ये व्यक्तिमत्व विकास व क्रीडा प्रशिक्षण इ. विविध प्रकारच्या शिबिराची सुरुवात व यशस्वी आयोजन.
  • विद्यालयातील सहशैक्षणिक उपक्रमांचे आयोजन यशस्वीरित्या व्हावे तसेच दैनंदिन शिस्त वाढावी यासाठी विद्यार्थी नेत्यांची प्रशिक्षणपूर्व मदत घेणारी अग्रणी योजना हि कल्पना नव्याने मांडून यशस्वीरित्या अमलात आणली.
  • मैदान, जिम्नॅस्टिक्स हॉल आणि व्यायामशाळा इ. क्रीडा सुविधांची उभारणी करण्यात पुढाकार. यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान मिळविण्यात यशस्वी. तसेच येथे चालू असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची जुळवाजुळव.
  • विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अनेक साहस सहलीचे आयोजन (पावसाळी सहली, गिरीभ्रमण, सायकल सहली)
  • दरवर्षी विद्यालयातील २५० विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात तंबूतील शिबिराचे आयोजन.
  • शालेय विद्यार्थ्यांचे शारीरिक शिक्षणाचे गुणात मूल्यमापन तंदुरुस्तीच्या घटकांद्वारे करण्याची योजना अनेक वर्ष राबविली.