नमस्कार,
आज १०० व्या ‘मन की बात’ मध्ये माननीय पंतप्रधानांनी प्रबोधिनीच्या तीन कामांचा उल्लेख केला. प्रबोधिनीचे प्रतिनिधी प्रज्ञा ताईं आणि स्वप्नील दादा कार्यक्रमाला उपस्थित होते.
या ३ कामांचा –
१. सोलापूरचे पर्यावरण पूरक गणपती
२. बर्ची नृत्य सुरू केलं. त्यामुळे कसा वातावरणात बदल झालेला आहे.
३. अटल मधला एक प्रकल्प
आज मन की बात कार्यक्रमाचा १०० वा भाग. आजवर या कार्यक्रमात ज्या ज्या व्यक्तींचे, संस्थांचे उल्लेख आ. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले अशा सर्वांना मुंबईत निमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्रातील अशा १३ संस्था/व्यक्ती आहेत. त्यामुळे ज्ञान प्रबोधिनी संस्थेलाही निमंत्रण होते.
साहसी मोहिमा करणाऱ्यांपासून ते संशोधन करणाऱ्यांपर्यंत आणि शिक्षण संस्थांपासून ते निसर्ग सेवाकां पर्यंत अनेकांचा मेळा आज राजभवन मध्ये जमला होता. महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल मा. रमेश बैस यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.
प्रसिध्दी पासून दूर राहून समाजाभिमुख काम करणाऱ्यांची दाखल घेण्याची ही पद्धत नक्कीच हटके वाटली. या निमित्ताने दिग्गज कलाकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले होते. राजभवनही यानिमित्ताने पाहता आले. तेथील भुयारात उत्तम प्रदर्शनाची निर्मिती केली आहे. शालेय मुलांना जरूर दाखवावे असे आहे.
अधिकाधिक जणांना भेटण्याचा, संवाद करण्याचा प्रयत्न केला. ज्ञान प्रबोधिनी निगडीची वेदांगी कुलकर्णी हिलाही निमंत्रण होते. त्यासाठी ती खास परदेशातून आली होती.
(आ. संचालक, मनोजराव प्रवासात असल्याने ही संधी मला व श्री. सुधीर कुलकर्णी सर यांना मिळाली.)
शिवराज पिंपुडे
केंद्र प्रशासक
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र