Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
May 18, 2021

Day

sanitization

झालं गेलं गंगेला मिळालं…

एखाद्या घरात कोरोना शिरकाव करतो. कधी एखाददुसरा तर कधी सबंध घरच ताब्यात घेतो. पुढे चाचणी – उपचार ओघाने आलेच. पुढे ते सगळे मस्त बरे होतात. क्वचित प्रसंगी वाईट घटनेला सामोरं जावं लागतं … या आजारात बरे होण्याची टक्केवारी … (Recovery rate) प्रचंड आहे. तरीही कधी वयोमानामुळे , आधीच्या वैद्यकीय इतिहासमुळे (medical history) , कधी उपचाराला...
Read More
blood donation

रक्तदान शिबीर २०२१

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आणि १मे नंतरच्या वाढत्या लसीकरणामुळे बऱ्याच रक्तदात्यांना इच्छा असून देखील रक्तदान करता येणार नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून युवक विभागाने शंकर महाराज सेवा ट्रस्ट, चिंचवड यांच्या सोबत १ मे २०२१ रोजी मातृमंदिरात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या उपक्रमाची जबाबदारी हिमांशू गपचूप आणि अनुज देशपांडे या युवकांकडे होती. या व्यतिरिक्त १८...
Read More
support relief work

ज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य २०२१ – हेल्पलाईन 8390458155

📣 #JPNVStandsForYou | ज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य २०२१ | हेल्पलाईन 8390458155 सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढाईत साथ देण्यासाठी, ज्ञानप्रबोधिनी परिवाराने कोविड मदतकार्य २०२१ हा उपक्रम हाती घेतला आहे! टेलिमेडिसिन – फोन वरून डॉक्टरांचा सल्ला, रक्त-प्लाज्मा, घरपोच जेवणाचा डबा, औषधे पोहोचविणे अशा विविध पातळीवर कार्य सुरु आहे. यासाठी एक...
Read More
determination

नजरेपुढती वाटा खडतर हाताशी केवळ निर्धार…

नजरेपुढती वाटा खडतर हाताशी केवळ निर्धार । स्वप्न उद्याच्या उजळ दिसांचे जिद्दीने करूया साकार। दोन दिवसांपूर्वी एक फोन आला होता. मारुंजी गावातून… एका जोडप्याला गेले पाच दिवस सतत ताप आणि खोकला जाणवत होता. त्यांना कुठूनतरी आपल्या सेवावाहिनीबद्दल माहिती मिळाली व त्यांनी फोन केला. ते सांगत होते की आता ते बरे आहेत पण त्यांच्या २२ वर्षाच्या...
Read More
Antigen testing camp

च च चाचणीचा ….

आपली सेवावाहिनी सुरू होऊन आज दोन आठवडे पूर्ण होतायत. आज आपण एक वेगळा उपक्रम राबवला. मातृमंदिरात मोफत अँटीजेन चाचणी शिबिर आयोजित केले. वेळ ठरली. १६ मे , रविवार … सकाळी १० ते ५ …. आजकाल अनेक लोक सजग झाले आहेत. काही लक्षणं जाणवली तर स्वतः होऊन चाचणीसाठी पुढे येतात. पण बरेचदा होतं काय की तेवढा...
Read More
helping hands

वंदनाके इन स्वरोमे एक स्वर मेरा मिलालो…

प्रबोधिनीत सध्या मोठं काम सुरू आहे. अनेक युवक युवती , पालक महासंघ सगळे मिळून ही धुरा समर्थपणे पेलत आहेत , खरंच आपण पण काहीतरी करायला हवं असं वाटतंय , मी काय करू शकतो/शकते ? ….. या आशयाची वाक्यं हल्ली अनेकदा कायप्पावर वाचायला मिळत आहेत. एव्हाना आपलं काम , आपले कामासाठी आवाहन फॉर्म सगळंच viral झालंय....
Read More
helpline daily challenges

गोष्ट छोटी डोंगराएवढी …..

प्रसंग पहिला… “हॅलो , मी अमुक तमुक” ….. यानंतर मोठ्ठा पॉज … “कसं सांगू कळत नाहीये … आमच्या घरी सगळे पॉझिटिव्ह आलेत “… पुन्हा एक मोठा पॉज. आपली फोन घेणारी ताई विचित्र मनस्थितीत की या बाई बोलताना असं का थांबत आहेत ? अडखळत का बोलत आहेत. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या मदतीसाठीच ही आपली सेवावाहिनी आहे...
Read More
home quarantine counselling

मन वढाय वढाय ….

कोरोना टेस्ट केलीये ….रिपोर्ट पॉझिटिव्ह … उंचावलेल्या भुवया …त्रासलेला चेहरा …चढलेला पारा … गृह विलगीकरणात जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीची ही स्थिती असते आणि इतरांना ब्रह्माण्ड आठवत असते. स्वतःला कोरोना झालेला परवडला असं देखील मनात येतं क्षणभर. आणि त्यातून घरात दोघेच असतील तेही ज्येष्ठ नागरिक मग काय विचारता? असाच एक अनुभव आपल्या पूर्वाताईने...
Read More
plama donor

गाठी ऋणानुबंधाच्या ….

आपली सेवावहिनी सुरू झाल्यापासून अनेक जणांचे फोन येताहेत. त्यातलाच एक फोन …. माझ्या वडिलांना प्लाज्मा हवाय. त्यांनी पुढे रुग्णाचे – रुग्णालयाचे नाव , ब्लड ग्रुप , कोविड पॉझिटिव्ह आहे हे कळल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील सांगितला. तो सर्व नोंदवून त्यांना कळवतो असे उत्तर दिले. लगेचच प्लाज्माचे काम करणाऱ्या युवकांकडे ही माहिती पोहोचवली गेली. आपल्याकडे निगडी...
Read More
tiffin delivery

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मनाला उभारी देणारं – भरारी पथक

भरारी पथक, नुसतं नाव उच्चारलं तरी अंगात जोश येतो. शिवकाळात असल्यासारखं वाटतं. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राने ठरविले की आपण कोरोना काळात आता प्रत्यक्ष समाजामध्ये उतरून काम करणार आहोत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची मदत म्हणजे डबे आणि औषधे घरपोच पोहोचवणे. सगळ्या सदस्यांना साद घातली आणि म्हणता म्हणता भरारी पथकामध्ये २५हुन अधिक जण समाविष्ट झाले. पुरुषांबरोबर महिलाही...
Read More
1 2