२०१९ जुलै , ऑगस्ट महिन्यात महापूराचे संकट महाराष्ट्रावर आले होते. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोला तालुक्यात प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन तेथील बांधवाना अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू तसेच मानसिक आधार देण्याचे मोलाचे काम निगडी ज्ञानप्रबोधिनीने केले त्यात्त सर्व विभागातील साधारण १५० पालकांचा प्रत्यक्ष सहभाग होता. इथून ही आर्थिक मदत , वस्तू अन्नधान्य जमा करणे ,त्याची विभागणी ह्यात शिक्षकाबरोबर पालकांचा मोठं सहभाग होता.

आदित्यदादांनी विषयाची सुरुवात करताना ‘मीच इथे का? मलाच का बोलावले? याचे कारण सांगताना आपण इथे ‘Special Interest Group’ नाही तर ‘Special Purpose Group’ बनून एकत्र आलो आहोत हे आवर्जून सांगितले. तसेच ‘Purpose’ समजून घेण्यासाठी महासंघाच्या विविध उपक्रमात पुढाकार घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले
संघटन म्हणजे काय? ज्ञानप्रबोधिनी शाळा, पालक महासंघ, पालक समिती यांनी संघटितपणे व एकजीव होऊन काम का व कशासाठी करायचे हा विषय अतिशय विस्ताराने, तेवढ्याच सोप्या शब्दात आणि प्रभावीपणे मांडला. संघटन करण्यासाठी काय हवे या प्रश्नास पालक प्रतिनिधींनी हिरीरीने अनेक बाबी सुचवल्या (वरील चित्रात दिसतात). या सर्व बाबींना आदित्यदादांनी प्रबोधिनीच्या संघटन बांधणीच्या ‘कौशल्य, वृत्ती आणि प्रेरणा’ या त्रिसूत्रीमध्ये गुंफले
बैठकीच्या शेवटच्या भागात विचारलेल्या प्रश्नांना आदित्यदादांनी समर्पक उत्तरे दिली. पालक महासंघाचे माजी अध्यक्ष विवेकराव केळकर यांनी दादांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. गावडेदादांनी सर्वांचे आभार मानले व आदित्यदादांना पुनःपुन्हा अश्या कार्यशाळेच्या उपस्थितीचा आग्रह केला
महिला पालकांच्या ‘सखी प्रबोधिनी’ गटाची सुरुवात
उपक्रम : पुस्तक भिशी, व्याख्यान, अनुभव कथन, व्यायाम
पुढील उपक्रम:
वाहतूक संदर्भातील नियम आणि वाहतूक शिस्त- कार्यशाळा
प्रत्येक तीन महिन्यात एक व्याख्यान