भरारी पथक, नुसतं नाव उच्चारलं तरी अंगात जोश येतो. शिवकाळात असल्यासारखं वाटतं. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राने ठरविले की आपण कोरोना काळात आता प्रत्यक्ष समाजामध्ये उतरून काम करणार आहोत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची मदत म्हणजे डबे आणि औषधे घरपोच पोहोचवणे. सगळ्या सदस्यांना साद घातली आणि म्हणता म्हणता भरारी पथकामध्ये २५हुन अधिक जण समाविष्ट झाले. पुरुषांबरोबर महिलाही...Read More
आपली सेवावाहिनी सुरू झाल्यापासून नित्य नवा अनुभव कार्यकर्त्यांना येतोय. अनेक जण प्रत्यक्ष शाळेत येऊन सकाळी ९ ते रात्री ९ … इतकं काम करत आहेत अर्थात सोशल डिस्टन्सिंग , मास्क , सतत सॅनिटायझेशन आदी नियम पाळूनच. अगदी न दमता न थकता. सगळे जण एकमेकांपासून दूर राहून काम करत असलो तरी मनाने अधिकच जवळ येत आहोत हा...Read More
कथा एका मातेच्या व्यथेची ….. हेल्पलाईनवर सेवा सुरू झाल्याचा आजचा दुसरा दिवस …. फोन येणे सुरू झाले होते. लोक व्यक्त होत होते. आवश्यक त्या मदत – सेवेसाठी त्यांना जोडून दिले जात होते. ४ तारखेला सकाळी साधारण नऊ साडे नऊची वेळ … फोन खणखणला … समोरून एक अस्वस्थ , प्रचंड घाबरलेला आवाज … हॅलो ताई ,...Read More
कोरोना गेला गेला असं वाटत असतानाच मार्च महिन्याच्या शेवटी ध्यानीमनी नसताना दुसरी लाट येऊन धडकली आणि पुन्हा एकदा हाहाकार …. दररोज मन विषण्ण करणाऱ्या बातम्या येत होत्या. ही लाट आधीपेक्षा भयंकर आहे हे जाणवत होतं. अनेक जुने जुने माजी विद्यार्थी सध्या शाळेशी संलग्न असणाऱ्यांना फोन करून उपासनेचा , आरतीचा ऑडिओ आहे का ? थोडी मनःशांतीची...Read More
Recent Comments