1st International Olympic Research Conference, Ahmadabad.
२७ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत अहमदाबाद येथे आयोजित परिषदेमध्ये ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातील क्रीडाकुल विभागातील कामावर आधारित २ पेपरचे सादरीकरण झाले.
१. ‘ऑलिंपिकचा इतिहास’ या विषयावरील प्रदर्शन.
२. टाटाट्रस्ट बरोबर चालू असलेला ‘ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्प’.
आपण करत असलेल्या या उपक्रमाबद्दल अध्यक्षांनी आणि उपस्थितांनी भरघोस प्रतिसाद दिला तसेच मूलभूत विषयांवर आपली संस्था काम करीत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांनी यानंतर व्यक्तिगत संपर्क करून संस्थेची माहिती करून घेतली.
अहमदाबाद येथील राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या रिसर्च डिपार्टमेंटने आपण त्यांच्या बरोबर संयुक्त काम करावे अशी विनंती देखील केली आहे.
देशातील होऊ घातलेल्या २०३६ ऑलिंपिक स्पर्धांच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्वाची आहे.