आपली सेवावाहिनी सुरू होऊन आज दोन आठवडे पूर्ण होतायत. आज आपण एक वेगळा उपक्रम राबवला. मातृमंदिरात मोफत अँटीजेन चाचणी शिबिर आयोजित केले. वेळ ठरली. १६ मे , रविवार … सकाळी १० ते ५ …. आजकाल अनेक लोक सजग झाले आहेत. काही लक्षणं जाणवली तर स्वतः होऊन चाचणीसाठी पुढे येतात. पण बरेचदा होतं काय की तेवढा वेळ...Read More
प्रबोधिनीत सध्या मोठं काम सुरू आहे. अनेक युवक युवती , पालक महासंघ सगळे मिळून ही धुरा समर्थपणे पेलत आहेत , खरंच आपण पण काहीतरी करायला हवं असं वाटतंय , मी काय करू शकतो/शकते ? ….. या आशयाची वाक्यं हल्ली अनेकदा कायप्पावर वाचायला मिळत आहेत. एव्हाना आपलं काम , आपले कामासाठी आवाहन फॉर्म सगळंच viral झालंय. कोण...Read More
प्रसंग पहिला… “हॅलो , मी अमुक तमुक” ….. यानंतर मोठ्ठा पॉज … “कसं सांगू कळत नाहीये … आमच्या घरी सगळे पॉझिटिव्ह आलेत “… पुन्हा एक मोठा पॉज. आपली फोन घेणारी ताई विचित्र मनस्थितीत की या बाई बोलताना असं का थांबत आहेत ? अडखळत का बोलत आहेत. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या मदतीसाठीच ही आपली सेवावाहिनी आहे की....Read More
कोरोना टेस्ट केलीये ….रिपोर्ट पॉझिटिव्ह … उंचावलेल्या भुवया …त्रासलेला चेहरा …चढलेला पारा … गृह विलगीकरणात जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीची ही स्थिती असते आणि इतरांना ब्रह्माण्ड आठवत असते. स्वतःला कोरोना झालेला परवडला असं देखील मनात येतं क्षणभर. आणि त्यातून घरात दोघेच असतील तेही ज्येष्ठ नागरिक मग काय विचारता? असाच एक अनुभव आपल्या पूर्वाताईने घेतलाय....Read More
आपली सेवावहिनी सुरू झाल्यापासून अनेक जणांचे फोन येताहेत. त्यातलाच एक फोन …. माझ्या वडिलांना प्लाज्मा हवाय. त्यांनी पुढे रुग्णाचे – रुग्णालयाचे नाव , ब्लड ग्रुप , कोविड पॉझिटिव्ह आहे हे कळल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील सांगितला. तो सर्व नोंदवून त्यांना कळवतो असे उत्तर दिले. लगेचच प्लाज्माचे काम करणाऱ्या युवकांकडे ही माहिती पोहोचवली गेली. आपल्याकडे निगडी केंद्रातील...Read More