Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
सामाजिक कार्य

Category

helping hands

वंदनाके इन स्वरोमे एक स्वर मेरा मिलालो…

प्रबोधिनीत सध्या मोठं काम सुरू आहे. अनेक युवक युवती , पालक महासंघ सगळे मिळून ही धुरा समर्थपणे पेलत आहेत , खरंच आपण पण काहीतरी करायला हवं असं वाटतंय , मी काय करू शकतो/शकते ? ….. या आशयाची वाक्यं हल्ली अनेकदा कायप्पावर वाचायला मिळत आहेत. एव्हाना आपलं काम , आपले कामासाठी आवाहन फॉर्म सगळंच viral झालंय....
Read More
helpline daily challenges

गोष्ट छोटी डोंगराएवढी …..

प्रसंग पहिला… “हॅलो , मी अमुक तमुक” ….. यानंतर मोठ्ठा पॉज … “कसं सांगू कळत नाहीये … आमच्या घरी सगळे पॉझिटिव्ह आलेत “… पुन्हा एक मोठा पॉज. आपली फोन घेणारी ताई विचित्र मनस्थितीत की या बाई बोलताना असं का थांबत आहेत ? अडखळत का बोलत आहेत. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या मदतीसाठीच ही आपली सेवावाहिनी आहे...
Read More
home quarantine counselling

मन वढाय वढाय ….

कोरोना टेस्ट केलीये ….रिपोर्ट पॉझिटिव्ह … उंचावलेल्या भुवया …त्रासलेला चेहरा …चढलेला पारा … गृह विलगीकरणात जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीची ही स्थिती असते आणि इतरांना ब्रह्माण्ड आठवत असते. स्वतःला कोरोना झालेला परवडला असं देखील मनात येतं क्षणभर. आणि त्यातून घरात दोघेच असतील तेही ज्येष्ठ नागरिक मग काय विचारता? असाच एक अनुभव आपल्या पूर्वाताईने...
Read More
plama donor

गाठी ऋणानुबंधाच्या ….

आपली सेवावहिनी सुरू झाल्यापासून अनेक जणांचे फोन येताहेत. त्यातलाच एक फोन …. माझ्या वडिलांना प्लाज्मा हवाय. त्यांनी पुढे रुग्णाचे – रुग्णालयाचे नाव , ब्लड ग्रुप , कोविड पॉझिटिव्ह आहे हे कळल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील सांगितला. तो सर्व नोंदवून त्यांना कळवतो असे उत्तर दिले. लगेचच प्लाज्माचे काम करणाऱ्या युवकांकडे ही माहिती पोहोचवली गेली. आपल्याकडे निगडी...
Read More
tiffin delivery

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मनाला उभारी देणारं – भरारी पथक

भरारी पथक, नुसतं नाव उच्चारलं तरी अंगात जोश येतो. शिवकाळात असल्यासारखं वाटतं. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राने ठरविले की आपण कोरोना काळात आता प्रत्यक्ष समाजामध्ये उतरून काम करणार आहोत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची मदत म्हणजे डबे आणि औषधे घरपोच पोहोचवणे. सगळ्या सदस्यांना साद घातली आणि म्हणता म्हणता भरारी पथकामध्ये २५हुन अधिक जण समाविष्ट झाले. पुरुषांबरोबर महिलाही...
Read More
uniform hearts

होती अनेक हृदये जरी एकरूप …

आपली सेवावाहिनी सुरू झाल्यापासून नित्य नवा अनुभव कार्यकर्त्यांना येतोय. अनेक जण प्रत्यक्ष शाळेत येऊन सकाळी ९ ते रात्री ९ … इतकं काम करत आहेत अर्थात सोशल डिस्टन्सिंग , मास्क , सतत सॅनिटायझेशन आदी नियम पाळूनच. अगदी न दमता न थकता. सगळे जण एकमेकांपासून दूर राहून काम करत असलो तरी मनाने अधिकच जवळ येत आहोत हा...
Read More
The story of a mother's grief

कथा एका मातेच्या व्यथेची…

कथा एका मातेच्या व्यथेची ….. हेल्पलाईनवर सेवा सुरू झाल्याचा आजचा दुसरा दिवस …. फोन येणे सुरू झाले होते. लोक व्यक्त होत होते. आवश्यक त्या मदत – सेवेसाठी त्यांना जोडून दिले जात होते. ४ तारखेला सकाळी साधारण नऊ साडे नऊची वेळ … फोन खणखणला … समोरून एक अस्वस्थ , प्रचंड घाबरलेला आवाज … हॅलो ताई ,...
Read More
helpline-started

आणि हेल्पलाईन सुरू झाली …..

कोरोना गेला गेला असं वाटत असतानाच मार्च महिन्याच्या शेवटी ध्यानीमनी नसताना दुसरी लाट येऊन धडकली आणि पुन्हा एकदा हाहाकार …. दररोज मन विषण्ण करणाऱ्या बातम्या येत होत्या. ही लाट आधीपेक्षा भयंकर आहे हे जाणवत होतं. अनेक जुने जुने माजी विद्यार्थी सध्या शाळेशी संलग्न असणाऱ्यांना फोन करून उपासनेचा , आरतीचा ऑडिओ आहे का ? थोडी मनःशांतीची...
Read More
1 2