पक्ष्यांच्या खाद्यानुसार त्यांच्या चोचीची रचना, निवासाच्या ठिकाणानुसार पायांची, बोटांची रचना इथपासून ते विणीच्या हंगामाचा कालावधी, भारतातील सर्वात मोठा पक्षी, छोटा पक्षी असं खूप काही नचिकेत भरभरून बोलला.
त्यानंं काढून दाखवलेल्या पक्ष्यांच्या आवाजानंं तर मुलं हरखूनच गेली.
सलग दीड तास मांडणी आणि नंतर अर्धा तास प्रश्नोत्तरे.
नचिकेतचा अभ्यास, बोलण्याची पद्धत, सोबत ppt ची असलेली जोड…
सत्र एकदम बढीया झालं.
समारोप मी केला,
“मुलांनो उद्याचा रविवार पक्षी निरीक्षणाचा वार म्हणून साजरा करू. आता मात्र नावानिशी नोंदी करा. तुम्हाला सोपे जावे म्हणून नचिकेत दादाचे ppt ग्रुप वर पाठवून ठेवतो. त्याचा वापर करा. आणि हो नवीन कुठला पक्षी दिसला तर फोटो काढायला विसरू नका…”
५ वी, ६ वीसाठी इतकंं पुरेसं वाटलं.
७ वीनंं मात्र जरा आठवडाभर निरीक्षण करून संख्येनिशी नोदी कराव्यात असंं वाटलं.
याबाबत त्यांच्याशी एक छोटा संवाद केला.
काय करायचंं, कसंं करायचंं हे समजावून सांगितलंं.
येत्या रविवारी गुगल फॉर्म पाठवून त्यात नोंदी भरून घेण्याचंं ठरलंं आहे.
आपल्या परिसरातील पक्षीगणना.
मुलांसमोर आज पक्ष्यांचे विश्व उलगडलंं गेलं होतं.
पक्षी हे आपल्या परिसराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीनंं त्यांचंं एक स्थान आहे.
ते ओळखायला हवंं.
जपायला हवंं.
नावानिशी पक्ष्यांची ओळख हे त्यातील पहिलंं पाऊल.
परिसर अभ्यासातील एका भागाच्या अभ्यासास सुरुवात झाली होती…
………………………
मीही एक धडा घेतला.
परिसरातील पक्षी निरीक्षण झाल्याशिवाय भिगवणला मुलांना नेणार नाही;
याआधी झालेली चूक दुरुस्त करेल.
………………………
व्याख्यानानंतर नचिकेतला फोन झाला.
“नचिकेत मस्त झालं रे व्याख्यान. मुले अगदी रंगून गेली होती. किरण पुरंदरे सर नागझिर्याला राहायला गेले आहेत. कायमचे. त्यांची उणीव भासू देऊ नकोस मित्रा आम्हाला.”
………………………
व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी मला एक व्हिडीओ व msg आला.
‘दादा काल व्याख्यान चालू असतानाच योगायोगानंं आमच्या बाल्कनीत मुनियाची जोडी घरटंं करायला आली. व्याख्यान झाल्यावर अमोघनं खूप वेळ त्यांंचे व्हिडीओ शुटींग केले. त्याचा हा fast forwarded video.’
https://drive.google.com/file/d/1F3fF1OwH6CGYJ3X8bmjZ1uj9UEfdY3sY/view?usp=drivesdk
“अरे वा मस्तच. रोजच्या रोज निरीक्षण ठेवायला सांगा. किती दिवसात घरटे पूर्ण झालंं? त्यासाठी रोज किती तास पक्षी काम करत होते? काय काय साहित्य वापरलं? घरटे पूर्ण झाल्यावर किती दिवसांनी अंडी घातली? पिले किती दिवसांनी बाहेर आली? इ. इ… छान प्रकल्प होईल.”
मला खूपच उत्सुकता आहे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची.
तुम्हाला?
………………………
आठवडा होऊन गेला होता.
पक्षी गणनेविषयी संवाद करून झाला होता.
७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ४ दिवस निरीक्षण, नोंदी करून गुगल फोर्म भरला.
त्यासाठी ३४ जणांनी तरी ppt मध्ये नसलेले फोटो पाठवून त्या पक्ष्यांची नावे विचारली.
विषयं मुरत असल्याची ही एक छोटी खुण होती.
हे झाल्यावर विज्ञान अध्यापिका स्मिताताई माने यांनी उत्स्फूर्तपणे वीणा गवाणकर लिखित डॉ. सालिम आली यांचं छोटेखानी चरित्र pdf स्वरुपात पाठवलं.
वाचनासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली.
छान वाटलं.
आता खऱ्या अर्थानं परिसरातील पक्षी निरीक्षण हा विषय पूर्ण झाला असं वाटलं.
करोनाच्या नजरकैदेतून सुटल्यावर आमचा नारा ठरला आहे.
चलो भिगवण…
https://drive.google.com/file/d/1-ahWgWanocA04YDc-BCTQB03XEfPCA-s/view?usp=drivesdk
(नचिकेतने केलेले ppt)
शिवराज पिंपुडे
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय