Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

कार्यवृत्त – जून २०२० ते मे २०२१

शिक्षण म्हणजे माणूस घडविणे असे मानून आयुष्यभर त्यासाठी झटणारे नु.म.वि. प्रशाला, ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि निगडी येथील शेकडो विद्यार्थी ज्यांन आपल्या जीवनाचे श्रेय देतात, निगडीतील अध्यापक-पालकच नव्हे तर हितचिंतक, देगणीदार या सर्वांचेच प्रेरणास्थान असणारे, पिंपरी चिंचवड मधील उद्योजक-सामाजिक धार्मिक संस्था, अगदी राजकीय नेते हे सुद्धा ज्यांच्याकडे श्रद्धेने सल्ला मसलत साठी येत असत. शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्तीची मंदिरे उभारणारे, महाराष्ट्रातच नव्हे तर परिसरातील राज्यातील अनेक शाळा आणि शिक्षण प्रेमींच्या हृदयात पंचकोश विकासात्मक भारतीय शिक्षण पद्धतीचा दीप प्रज्वलित करणारे चैतन्य.. ज्यांना आपण भाऊ तथा वामन नारायण अभ्यंकर या नावाने ओळखत होतो, ते चैतन्य सौर माघ २७ शके १९४२, दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी विश्वचैतन्यात विलीन झाले, त्यांचे स्मरण म्हणजे एकेका विद्यार्थ्यांमध्ये उत्साह सामर्थ्य राष्ट्रप्रेम निर्माण होते आहे ना? हे तपासत शिक्षणाचे काम करीत राहणे, भाऊंच्या निर्वाणाच्या या आघातातून सावरून पुन्हा कामाला लागण्याच्या प्रयत्नात आपण सारे आहोत.

2 Responses

Leave a Reply